
पंतप्रधान मोदींच्या सभेला ५०० रुपये ठरले अन २०० दिले !
दै. बातमीदार । १ मे २०२३ । देशातील प्रत्येक पक्षासाठी जनता हि महत्वाची मानली जात असते. त्यासाठी जनतेलाच प्रचारात देखील आणले जाते. त्यासाठी सभेला होत असलेल्या गर्दीवरून पक्षाला असणाऱ्या जनमताचा अंदाज येतो. त्यामुळे काही पक्ष भाडोत्री माणसे आणून सभेला गर्दी जमवत असल्याचे दिसून आले आहे. काही सभांसाठी अनेकांना पैसे देत आणले जाते. मात्र, त्या लोकांना पैसे देण्याचे आश्वासन देत नंतर शब्द फिरवण्यात येतो. अशीच घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी घडल्याची माहिती उघड झाली आहे.
बंगळुरूजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार होती. त्या सभेत सहभागी होण्यासाठी भाजपच्या एका स्थानिक नेत्याने काही मजूरांना आणि सभेत सहभागी होणाऱ्यांना 500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सभेनंतर त्यांच्या हातावर 200 रुपये टेकवत त्यांची बोळवण करण्यात आली. सभेत सहभागी झाल्यास 500 रुपये देण्याचे आश्वासन दिले, मात्र, प्रत्यक्षात प्रत्येकी 200 रुपयेच दिले, असा आरोप करत शनिवारी कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात मजुरांसह स्थानिक लोकांनी आंदोलन केले. त्यांनी सांगितले की, सभेत सहभागी होण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने 500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पाळण्यात आलेले नाही. प्रत्यक्षात आम्हाला फक्त 200 रुपयेच मिळाले आहेत. या आंदोलनामुळे ही घटना उघडकीस आली, तसेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले.
https://twitter.com/pbhushan1/status/1652643496598310913/photo/1?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1652643496598310913%7Ctwgr%5Ede0b15a514024468208ab8510557e3b83d8f8e3c%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fm.dailyhunt.in%2Fnews%2Findia%2Fmarathi%2Fforyou%2Fforyou%3Fmode%3Dpwalangchange%3Dtruelaunch%3Dtrue
आंदोलन करणारे मजूर आणि स्थानिक यांची तेथील एका नेत्याने भेट घेतली. त्यांच्या समस्या आणि मागण्या समजून घेत त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात आला. हे प्रकरणा सौहार्दपूर्णपणे सोडवण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, या आंदोलनामुळे काही पक्ष सभेसाठी पैसे देऊन माणसे आणतात. ही गोष्ट उघडकीस आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम