अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ जुलै २०२३ ।  राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघातात २६ प्रवाशी ठार झाल्याची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी भेट देवून पाहणी केली आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार श्वेता महाले यांनी घटनास्थळाची पाहणी करुन माहिती घेतली. या अपघात मृत्यू झालेल्या प्रवशांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

नागपूरहून पुण्याकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला असून अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी अपघातानंतर बाहेर पडले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. बुलढाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.

समृद्धी महामार्गावर ही बस नागपूरहून पुण्याकडे येत होती. बस मध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. पिंपळखुटा गावालगत समृद्धी महामार्गावरून जात असताना बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर बसने पेट घेतला. बस मध्ये असणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. बस पलटी झाल्याने बसचा दरवाजा हा खालच्या भाग बाजूला आला त्यामुळे प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून घटना हृदयद्रावक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेतील प्रवाशांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमी प्रवाशांना पन्नास हजार रुपयांचे भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम