मुख्यमंत्र्यांनी दिली महायुतीच्या मंत्र्यांना तंबी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ नोव्हेबर २०२३

गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु आहे तर आता ‘‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये सुरु असलेल्या वक्तव्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

‘‘निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत कोणीही यावर वक्तव्य करू नये,’’ अशा सूचना शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या. विशेषतः मंत्री छगन भुजबळ आणि शंभुराज देसाई यांनी वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांची मराठा आरक्षण, राज्यातील परिस्थिती आणि मंत्र्यांची याबाबत सुरु असलेली वादग्रस्त विधाने याबाबत चर्चा केली. मराठा आरक्षणाबाबत छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेवर मंत्री शंभुराज देसाई यांनी या बैठकीतही आक्षेप घेतला. मात्र, अन्य मंत्र्यांच्या भूमिकेमुळे सरकार पडेल, या भुजबळांच्या वक्तव्यावर शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर छगन भुजबळ यांनी बीडमधील गंभीर परिस्थिती पाहिल्यानंतर रागातून बोलल्याचा खुलासा केला. ‘‘महायुतीत विसंवाद असल्याचे चित्र जनमानसात जाऊ नये, यासाठी मंत्र्यांनी आपापसांत समन्वय ठेवावा,’’ असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. ‘‘दोन समाजांत जातीय तेढ निर्माण होणार नाही, याचे भान ठेऊन मंत्र्यांनी जबाबदारीने बोलावे. आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्या,’’ अशी समज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम