मुख्यमंत्र्यांनी शेतात भरविला दरबार !
दै. बातमीदार । २३ जून २०२३ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच सातारा जिल्ह्यात दौऱ्यावर असतांना आपली मूळ गावी मुख्यमंत्री शिंदे यांनी फेर फटका मारला असता. तिथे त्यांनी शेतीत काम केलं, जनता दरबार भरवला आणि थेट दुचाकीवरुन रपेट मारली. सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गाव आहे. मुख्यमंत्री झाल्यापासून ते दोन ते तीन वेळेस गावी गेलेले आहेत. मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री गावी गेलेले आहेत. त्यांनी एका दुचाकीवरुन गावात फेरफटका मारला. शिवाय शेतीमध्ये जावून पिकांची पाहाणी केली आणि कामंही केलं.
मुख्यमंत्र्यांनी गावातील आणि परिसरातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार भरवला. कोयना धरणातील गाळ काढण्याचा शुभारंभ नुकताच मुख्यमंत्र्यांनी केला. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठका घेऊन कामाचा झपाटा सुरुच ठेवला आहे. परिसराच्या गावातील लोक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गर्दी करत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आलेल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांवर सणसणीत टीका केली होती. त्या टीकेला भाजप आणि शिंदे गटाकडून जशासतसं उत्तर देण्यात आलं. आता मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळ गावी साताऱ्यातील दरे इथं आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम