
मध्यरात्री मुख्यमंत्र्याची बैठक तर आमदारांची झोप उडाली !
दै. बातमीदार । १५ नोव्हेबर २०२२ ठाकरे गटातून शिंदे दूर झाल्यानंतर सत्तास्थापन करून पहिल्या मंत्रीमंडळ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झाले पण आता पुन्हा मंत्रीमंडळाचा विस्तार अजून झाला नसताना विरोधकांनी सत्ताधाऱ्याना चांगलेच पेचात पकडले आहे. तर सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक झाल्याची चर्चा राज्यभर पसरल्याने आमदाराची मात्र झोप उडाली आहे.
राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार बाकी असतांनाच मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मध्यरात्री वर्षा निवासस्थानी काळ खलबत झाली. यामुळे राज्यातील मंत्री पदासाठी नंबरमध्ये असलेले आमदाराची झोप उडाली होती. राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे-फडणवीसांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काल, सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर दाखल झाले. या दोघांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. ही चर्चा मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांचा विस्ताराबाबत झाली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम