
अमळनेर शहरात ऑल मुस्लिम समाजाच्या ११ जोडप्यांचे सामुहिक विवाह सोहळा संपन्न… हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थांचे संस्थापक अध्यक्ष कौसर शेख यांच्या आठवणींना उजाळा.
अमळनेर (आबिद शेख ) येथील हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही तिसऱ्या वर्षी १२ नोव्हेंबर रोजी ऑल मुस्लिम समाजाच्या अकरा जोडप्यांचे सामुहिक विवाह सोहळा सुरत येथील हाफीज सैय्यद अमीन मौलाना यांच्या मुख्य उपस्थितीत शहरातील बोरी नदी जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न झाले
हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थांचे संस्थापक अध्यक्ष कौसर रियाजोद्दीन शेख यांच्या नुकतेच बगदाद येथे निधन झाले त्यांची आठवणी ही आठवणच राहुन गेली संपूर्ण सामुहिक विवाह सोहळ्याची तयारी त्यांच्या हाताने पूर्ण करण्यात आली होती दर वर्षी गावातील प्रतिष्ठित नागरिक व बाहेरगावाहून आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात येतो परंतु संस्थाचे अध्यक्ष कौसर शेख यांच्या निधनामुळे सर्व सत्कार रद्द करण्यात आले या सामुदायिक विवाहात मुली कडून पाच हजार एकशे रुपये घेऊन संस्था तर्फे कुराण शरीफ,जानमान, दुप्पटा, कपाट ,पलंग सेट, संसारातील आवश्यक वस्तू व शंभर लोकांना जेवन तसेच मुला कडून तीन हजार एकशे रुपये व शंभर लोकांना जेवन अश्या पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारचे डिजे बॅन्ड गोडा, फटाके वगैरे रहात नाही विवाह नोंदणी करण्या पूर्वी हे नियम सांगितले जातात तसेच शहरातील सर्व मस्जिदेतील मौलाना, सुन्नी दावते इस्लामी चे मुबलिक,आणि विविध मोहल्लेतील युवक सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते ज्या लोकांनी देंणगी दिले असे सर्वांचे संस्थांच्या माध्यमातून आभार व्यक्त करण्यात आला सामुहिक विवाह सोहळ्यात हसनैन करीमैन वेल्फेअर संस्था तर्फे हाजी शब्बीर अली सैय्यद, इब्राहिम शेख बशीर, मोना शेख, आरिफ मेमन, सैय्यद नबी, अशफाक शेख, जाकिर शकुर शेख, सैय्यद अजहर अली, जुबेर खान पठाण, यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक मोहोतेशिम हजरत यांनी केले तर सुत्रसंचलन इब्राहिम सर यांनी केले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम