अकोला दि. 25 ऑगस्ट | गणेश विसर्जन मिरणूक विसर्जन मार्गाची पाहणी जिल्हाधिकारी निमा अरोरा व पोलिस अधक्षिक जी. श्रीधर यांनी केली. विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी रस्त्याची दुरूस्ती, विज वाहिन्या, केबल, अतिक्रमण इत्यादी कामे गणेश विसर्जनापूर्वी पुर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिलेत.
शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी श्री मुर्तिचे विसर्जन केले जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे व सुरळीत पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी जयहिंद चौक पोलीस चौकीपासुन विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष ॲड, मोतिसिंग मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा आदिसह विविध विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी जयहिंद चौक पोलीस चौकी, दगडीपुल रोड, अगरवेस, मामा बेकरी, टिळक रोड, अकोट स्टँड, सुभाष चौक, मो.अली मशीद, जैन मंदीर रोड, गांधी रोड, सिटी कोतवाली असे मार्गक्रमण करीत विसर्जन स्थळ असलेल्या गणेश घाटाची पाहणी केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम