न्यायालयाने दिलेली मुदत संपली : सोमवारपासून होणार कारवाई !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ नोव्हेबर २०२३

राज्यात गेल्या काही वर्षापासून दुकानावर मराठी पाट्यांचा मुद्दा राज्यभर तापला होता त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत शनिवारी दि.२५ रोजी संपणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून दि.२७ दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत, तर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रतिकर्मचारी दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. सुमारे सात लाख दुकाने-आस्थापनांपैकी फक्त २८ हजार दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या आहेत.

मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्यासाठी दुकानदारांना पालिकेने तीन वेळा मुदतवाढ दिली. मात्र, त्यानंतरही अवघ्या २८ हजार दुकानदारांनीच मराठी पाट्यांची अंमलबजावणी केल्याचे समोर आले आहे. व्यापाऱ्यांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेऊन दोन महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. ती २५ नोव्हेंबरला संपणार असल्याने सोमवारपासून दुकानांवर मराठी पाटी नसेल, तर नोटीस न देता थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम