प्रसिद्ध अभिनेत्री करतेय नेत्याला डेट !

बातमी शेअर करा...

बॉलीवूड क्षेत्रातील अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नांच्या चर्चांना उधाण आलं आहे. आजकाल ते एकमेकांसमवेत वेळ घालवताना दिसत आहेत. त्याचबरोबर येत्या काही दिवसांतच त्यांचे लग्न संपन्न होईल अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. नुकतेच ते दोघे एकत्र क्रिकेट मॅच पाहायला गेले असताना स्पॉट झाले. त्यामुळे त्या दोघांबद्दल चर्चा जोरात सुरू झाली होती.

आता ते अनेकदा एकत्र स्पॉट होतानाही दिसत आहेत. राघव आणि परिणिती एकत्र कधी, कुठे आणि केव्हा भेटले याबद्दल त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे त्याचसोबत ते कधी लग्न करणार याबद्दलही त्यांच्याच प्रचंड उत्सुकता आहे.

परिणिती चोप्रा ही एक यशस्वी बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती तिच्या आगळ्यावेगळ्या भुमिकांसाठी ओळखली जाते. प्रियंका चोप्राची बहीण म्हणूनही परिणितीची ओळख आहे परंतु तुम्हाला माहितीये का परिणिती चोप्रा ही नक्की बॉलिवूडमध्ये कशी आणि कधी आली? परिणिती चोप्रानं आपल्या स्ट्रगलबद्दल  अनेकदा मुलाखतीतून भाष्य केलं आहे. एकेकाळी आपल्याकडे पैसे नव्हते त्याचप्रमाणे आपल्याशी बोलायला कोणी मित्र-मैत्रीणीही नव्हते, असंही तिनं आपल्या एका मुलाखतीतून सांगितले होते. सध्या राघव चड्ढासोबतच्या लिंकमुळे परिणिती चोप्रा सध्या चर्चेत आली आहे. परंतु तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का की नक्की

परिणिती चोप्रा ही बॉलिवूडमध्ये कशी आली?

परिणिती चोप्रा हिनं ‘रॉकी वर्सेस रिकी बेल’ या चित्रपटातून कमबॅक केले होते. परंतु त्याआधी ती परदेशात उच्च शिक्षण घेत होती. मॅनचेस्टर येथे ती बिझनेस, फायनान्स आणि अर्थशास्त्र या विषयातून ट्रिपल हॉनर्सची पदवी घेत होती. त्यानंतर तिनं परदेशात इन्व्हेसमेंट मॅनेजरची नोकरी करत होती. परंतु 2009 साली आर्थिक मंदी आल्यामुळे तिनं परत भारतात येण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर तिची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम