दिग्गज अभिनेत्याने केले ‘द केरळ स्टोरी’बाबत मोठे विधान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ मे २०२३ ।  देशभरात द केरळ स्टोरी चित्रपटावावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर आता बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी देखील चित्रपटाचे काैतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. विवेक अग्निहोत्री यांनी देखील चित्रपटाचा सपोर्ट केला आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, द कश्मीर फाईल्स चित्रपटाला विरोध करणारे आणि द केरळ स्टोरी चित्रपटाला विरोध करणारे एकच आहेत.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आता शत्रुघ्न सिन्हा यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाबद्दल मोठे विधान केले आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मी सर्वात अगोदर हे स्पष्ट करू इच्छितो की मी अजूनही द केरळ स्टोरी हा चित्रपट बघितला नाहीये. कारण मी सध्या प्रवासामध्ये इतका जास्त बिझी आहे की मी सोनाक्षी सिन्हा हिची वेब सीरिजही बघितली नाही. पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, माझा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु कोणत्याही राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या किंमतेवर नक्कीच नाही. एखाद्या चित्रपटामुळे राज्यातील शांततेला धोका निर्माण होत असेल तर त्या स्वातंत्र्यावर बंदी घालावी. अभिव्यक्तीचा अधिकार आहे तसा प्रशासनाचाही अधिकार देखील आहे.

ममता बनर्जी एक अशा नेत्या आहेत, ज्या पुढच्या गोष्टींचा कायमच गांर्भियाने विचार करतात. जर ममता बनर्जी यांना वाटत असेल की, द केरळ स्टोरी चित्रपटामुळे राज्यात सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते तर त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असेल आणि त्याची कारणी त्यांच्याकडे असावीत. पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ज्यावेळी निवडणूका असतात, त्याच वेळी द कश्मीर फाईल्स आणि द केरळ फाईल्ससारखे चित्रपट का रिलीज होतात?

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम