पन्नाशीच्या अभिनेत्रीने धरला ”बादल बरसा बिजुली’ गाण्यावर ठेका !
दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ । सध्या पन्नाशीत असलेल्या मराठी चित्रपटांत काम करणाऱ्या अभिनेत्रीने एका गाण्यावर डान्स केल्याने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होवू लागला आहे. हि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर असून त्या नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्यांच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सध्या रीलवर ‘बादल बरसा बिजुली’ हे गाणं ट्रेडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनाही या गाण्यावर रील करण्याचा मोह आवरता आलेला नाही. ऐश्वर्या यांनी अभिनेता अमोल बावडेकरसह ‘बादल बरसा बिजुली’ या गाण्यावर रील बनवला आहे. या व्हिडिओत ते दोघेही गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. “बादल…बादल…बादल…फायनली आपण हे केलं. कमाल आहे हे” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम