‘या’ लोकप्रिय कपलला पाच वर्षांनी झाली जुळी मुल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ ।  टीव्ही विश्वातील लोकप्रिय कपल म्हणून प्रसिद्ध असलेले पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे हे आहेत. २०१८ साली विवाहबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आता लग्नाच्या पाच वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. पंखुरी अवस्थीने मंगळवारी २५ जुलै जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. पंखुरी आणि गौतमला पुत्र आणि कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

एप्रिल महिन्यात पंखुरी आणि गौतमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईबाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. आता त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आईबाबा झाल्याची गुडन्यूज दिली आहे. गौतमी आणि पंखुरीने इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी “आम्हाला कन्या आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे”, असं म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनीही कमेंट करत अभिनंदन केलं आहे. मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने कमेंट करत पंखुरी आणि गौतमला शुभेच्छा दिल्या आहेत. पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांची पहिली भेट ‘रजिया सुलतान’ या टीव्ही शोच्या सेटवर झाली. २०१५ मध्ये ‘सूर्यपुत्र कर्ण’ या टीव्ही शोच्या सेटवर दोघे पुन्हा भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. फेब्रुवारी २०१८मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. आता लग्नाच्या पाच वर्षांनंतर ते आईबाबा झाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम