
राज्यात आढळला पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण !
बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ | जगभर २०१९ मध्ये कोरोना नावाची महामारी सुरु असतांना पुन्हा एकदा व्हेरियंटने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनच्या नव्या सब व्हेरियंटने आता धुमाकूळ घातला आहे. मात्र, पुण्यात मे महिन्यातच याचा एक रुग्ण आढळला होता असं समोर आलं आहे.
जीनोम सिक्वेन्सिंगचे महाराष्ट्राचे समन्वयक आणि बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी TOI शी बोलताना याबाबत माहिती दिली. “महाराष्ट्रात मे महिन्यात EG.5.1 आढळून आला होता. त्याचे निदान होऊन दोन महिने उलटून गेले आहेत आणि त्यात कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. जून आणि जुलैमध्ये राज्यात या सबव्हेरियंटचा प्रभाव वाढलेला दिसला नाही. तर, राज्यात सध्या XBB.1.16 आणि XBB.2.3 या व्हेरियंटचा प्रभाव अधिक दिसत आहे.” असं ते म्हणाले.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, जुलै अखेरीस सक्रिय कोविड-19 रुग्णांची संख्या 70 वरून 6 ऑगस्ट रोजी 115 वर पोहोचली. सोमवारी राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 109 एवढी होती. EG.5.1मुळे अलीकडेच युनायटेड किंगडममध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यूकेमध्ये EG.5.1 सबव्हेरियंटचा वेगवान प्रसार होत आहे, या नवीन कोरोना व्हेरियंटला एरिस (ERIS) असं नाव देण्यात आलं आहे. 31 जुलै रोजी याला अधिकृतपणे ओळखले गेले, या उपप्रकारामुळे संक्रमण वाढल्याचं दिसून येत आह. मुंबईत सध्या 43 सक्रिय कोविड-19 रुग्ण आहेत, तर पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या 34 इतकी आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम