राऊतांचा गोप्यस्फोट ; ठाकरे बंधू ‘या’ कारणाने येणार एकत्र ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | ८ ऑगस्ट २०२३ | कित्येक वर्षापासून ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी राज्यातील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते उत्स्तुक असून मागणी देखील केली होती. पण आजवर कधीच उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले नाही पण दोन दिवसापासून पुन्हा राज्याच्या राजकारणात उद्धव व राज एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या असून यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गोप्यस्फोट केला आहे.

संजय राऊत म्हणाले कि, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात, माझे या दोघांशीही चांगले सबंध आहेत. त्या विषयावर दोघे बोलत असताना बाकी कुणी बोलायची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. लोकसभेत आज अविश्वास प्रस्ताव आला आहे त्यावर आजपासून चर्चा होणार आहे. आम्ही INDIA मणिपूर मधील परिस्तिथीवर पंतप्रधान यांनी संसदेत बोललं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. माजी लष्कर प्रमुख देखील काळजी व्यक्त करत आहेत. पंतप्रधान यांच्या मन की बात संसदेत ऐकायची आहे. त्यासाठी हा अविश्वास ठराव आहे. राहुल गांधी या सगळ्या विषयावर काय बोलतात याकडे देशाचं लक्ष आहे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. मनमोहन सिंह यांनी काल संसदेच्या अधिवेशनाला हजेरी लावली. त्यावर ही लढाई आहे.यावर भाजपने बोलायची गरज नाही. संजय सिंह यांचा अभिमन्यू केला तरी आम्ही लढलो. महाराष्ट्रातील आता राज्यपाल आहेत कुठं? आमचं सरकार असताना ते बोलत होते.राज्यपाल तमिळनाडू, बंगाल मध्ये आहेत का? आम्हाला अपेक्षा होती तेवढी मत आम्हाला काल मिळाली आहेत. पण आम्ही बसून चर्चा करू, असंही ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम