राज्यपाल यांना दिल्लीत बोलावले ; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ नोव्हेबर २०२२ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरवण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत शिवरायांची तुलना उपस्थित पाहुण्यांशी केली. ते म्हणाले, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले. यावरून वाद सुरू झालाय.

महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भोवण्याची शक्यता निर्माण झालीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भगतसिंह कोश्यारी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठीत कोश्यारींच्या बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यताय. कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उभ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्याची धग दिल्लीपर्यंत पोहचलीय.

कोश्यारींच्या या वक्तव्याचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटतायत. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल असे का बोलतात मला समजत नाही. त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या, अशी हात जोडून पंतप्रधानांना विनंती केलीय. तसेच महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवणारी व्यक्ती नकोय. त्यांच्या मनात घाणेरडा विचार येतोच कसा, असा सवाल केलाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम