अंकिता लोखंडेचा ‘तो’ डान्स व्हिडीओ व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ नोव्हेबर २०२२ । अभिनेता सुशांतच्या निधनानंतर अंकिता देखील काही दिवस दुखात होती. यादरम्यान काही लोकांनी तिचा पती बिझनेसमन विकी जैनला देखील टार्गेट केले होते, जे अंकिताला अजिबातच आवडले नव्हते. यावर व्हिडीओ तयार करत अंकिताने आपली नाराजी जाहिर केली होती. सध्या अंकिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून अंकिता आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

नुकताच अंकिताने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामुळे ती चर्चेत आलीये. या व्हिडीओमध्ये अंकिता जबरदस्त असा डान्स करताना दिसत आहे. डान्स करते वेळी अंकिताचा अंदाजच निराळा दिसत आहे. अंकिताचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून चाहते या डान्स व्हिडीओवर कमेंट करत अंकिताचे काैतुक करताना दिसत आहेत. अंकिताचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झालाय.

 

या डान्स व्हिडीओमध्ये अंकिताचा अत्यंत बोल्ड लूक दिसतोय. अंकिताची डान्स करण्याची स्टाईल तिच्या चाहत्यांना आवडली आहे. काही सेलिब्रिटींनी देखील अंकिताच्या या डान्सचे काैतुक केले आहे. ये एक जिंदगी काफी नहीं है…या गाण्यावर अंकिताने डान्स केला आहे. विशेष म्हणजे फक्त एका जागी उभा राहून तिने हा डान्स केला नसून अनेक जागा या अंकिताने चेंज करत मूव्स डान्स केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम