भाऊ -बहिण जवळ येत असतानाच पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्यावर GST पथकाची रेड

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ एप्रिल २०२३ ।  राज्यातील सर्वच पक्षात भाऊबंदकीमध्ये मोठा वाद आहे. तसाच वाद भाजपचे दिग्गज नेते.स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या परिवारात असल्याचे चित्र नेहमीच दिसून आले आहे. त्यांचे पुतणे आ.धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे राजकीय वाद मोठा असल्याने अनेक टीकास्त्र दोघांकडून केले जाताना दिसत असते मात्र आता दोघे भाऊ बहीण एकत्र येत असल्याचे पाहत ते एकत्र येऊ नयेत म्हणून तर GST पथकाची रेड करण्यात आली नाही ना, या व अशा अनेक चर्चांना उत येत आहे. या मागे दबाव तंत्राचा वापर होतो आहे की काय, आशा शब्दात सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून जीएसटीचे अधिकारी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची चौकशी करत आहेत. नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी होत आहे. याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र आज सकाळपासून ही चौकशी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांची धनंजय मुंडेंसोबत जवळीक वाढत आहे. दोघे बहिण भाऊ आज एकाच व्यासपिठावर येणार आहेत. बीडच्या मानूर गावात आज गहिनाथ गडाच्या 90 व्या फिरता नारळी सप्ताहाची सांगता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र येणार आहेत. मात्र दुसरीकडे आज पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाकडून रेड टाकण्यात आली आहे.

दरम्यान संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात देखील भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र आल्याचं पहायला मिळालं. एकाच आठवड्यात दोघे बहिण, भाऊ दोनदा एकाच व्यासपीठावर आल्यानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वाढत्या जवळीकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम