लग्नात पंगतीतून उठावे लागले पाहुण्यांना ; काय घडले वाचा सविस्तर !
दै. बातमीदार । ५ मे २०२३ । यवतमाळमधील एका लग्न सोहळ्यात आलेले पाहुणे मंडळी मंडपात जेवणाच्या पंगती बसले असतांना अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केला. यामुळे वऱ्हाडींना भरल्या ताटावरुन उठावे लागले. यात 50 पेक्षा जास्त वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णलायात दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला.
यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेव येथे लग्नसोहळ्यादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. मधमाशांनी लग्न वऱ्हाडावर हल्ला चढवला. अनेकांना चावा घेतल्याने एकच धावपळ उडाली. यात 50 हुन अधिक वऱ्हाडी मंडळी जखमी झाले आहेत. गावातील मंदिरात हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. लग्न लागल्यानंतर वधू वरांकडील पाहुणे मंडळी जेवणाला पंगतीत बसले होते. यावेळी अचानक मधमाशांचे पोळे उठले आणि वऱ्हाडी मंडळींवर हल्ला चढविला. आग्यामोहोळ मधील माशांनी चावा घेतल्यामुळे वेदनेने वर वधूसह दोन्हीकडील पाहुण्यांची एकच पळापळ झाली. बचावासाठी काहींनी नाल्याच्या पाण्यात उड्या मारल्या. मात्र, दोन लहान मुलांसह अनेक महिला मधमाशांच्या चाव्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम