आमदार अपात्रप्रकरणी आता सोमवारपासून होणार सुनावणी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील दाव्याची सुनावणी सोमवारपासून (दि. २५) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर होणार आहे. शिवसेना पक्षावर दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपली बाजू मांडण्यासाठी पाचारण केले जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांना यासंदर्भातील घटनाक्रम व त्यांच्या समोरील सुनावणीचा अहवाल पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाचा असल्याने या प्रक्रियेला वेग आला आहे.

शुक्रवारी सकाळी नार्वेकर दिल्लीतून मुंबईत दाखल झाले. दिल्ली भेटीत त्यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांची भेट घेऊन न्यायालयाने दिलेल्या निर्देशांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. त्याचा अन्वयार्थही समजावून घेतला. त्यानंतर काही मान्यवरांच्या भेटी घेऊन नार्वेकर मुंबईत दाखल झाले.

या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना नार्वेकर म्हणाले, माझा दिल्ली दौरा हा पूर्वनियोजित होता. त्यात काही कायदेतज्ज्ञांची भेट मी घेतली, त्यांच्याशी अपात्रता प्रकरणी चर्चाही केली. केंद्र सरकारने महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले आहे. त्यानिमित्त फिक्की’च्या वतीने १०० कार्यक्षम महिलांचा गौरव करण्यात आला. त्याला मी उपस्थित होतो. सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यापासून सुनावणी घेण्यास सांगितले आहे. मात्र, आम्ही १४ सप्टेंबरपासूनच सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे मुद्दे मांडल्याने त्यांना वेळ दिला होता. आता सोमवारपासून पुन्हा एकदा सुनावणी सुरू होत आहे. सर्व आमदारांची सुनावणी झाल्यानंतर गरज भासल्यास शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या प्रमुखांना पाचारण करून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम