नागपुरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २३ सप्टेंबर २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे तर काही भागात मात्र दांडी मारली आहे. नुकतेच नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. मोर भवन परिसरात पाणीच पाणी जमा झाले. बस स्थानकावरील बस पाण्यात बुडाल्या. एका रात्रीत 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागपूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखोल भागात पाणी शिरले असून नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे. हवामान विभागाने नागपुरात आधीच ऑरेंज अलर्ट दिला होता. वास्तविक येथे अद्यापही पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाने शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज होता. त्यानुसार शुक्रवारी दिवसभर नागपूरमध्ये पाऊस सुरूच होता. मात्र, सायंकाळनंतर या पावसाची तीव्रता अधिकच वाढल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक वाहने आणि घरातील सामना पाण्यामुळे पूर्णपणे बुडाले होते. सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. त्या मुळे जिल्हा प्रशासन तातडीने कामाला लागले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या बाबत आवश्यक त्या उपाय – योजना करण्याच्या सूचना दिल्या होल्या. त्यानुसार एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्या बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम