राज्यातील भाजप नेत्यावर हायकमांड नाराज ; काय घडले प्रकरण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ एप्रिल २०२३ । गेल्या काही वर्षापासून राज्यातील भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर व आता पुन्हा एक नवे वक्तव्य केल्याने देशभरातून प्रतिक्रिया येत असल्याने त्यांच्यावर भाजपचे हायकमांड नाराज असल्याचे दिसत आहे. अशी प्रतिक्रिया देखील येवू लागली आहे. त्यामुळे आता त्यांना हे वक्तव्य करणे चांगलेच भोवणार आहे.

बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, हे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपचे हायकमांड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीव्र नाराज असल्याचे समजते. त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना तसे स्पष्ट संकेत दिलेत. येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर वादग्रस्त वक्तव्ये टाळा, अशी सक्त ताकीद अमित शहांनी दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना हे वक्तव्य भोवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आशिष शेलार काल दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे-शरद पवार भेट. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी यासोबतच चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर चर्चा झाली. यावेळी अमित शहा यांनी पाटील यांच्या वक्तव्याबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. येणाऱ्या काळात निवडणुका आहेत. तत्त्पूर्वी भाजप नेत्यांकडून अशी वादग्रस्त विधाने केली जात आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचने केलेल्या कामांवर पाणी फेरले जात आहे. हेच पाहून अशी वक्तव्ये टाळण्याची सक्त ताकीद दिली. तसेच फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्याच कामावर बोलावे असे स्पष्ट निर्देशही अमित शहा यांनी दिल्याचे समजते.

अमित शहा यांच्या भेटीनंतर आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळीही त्यांनी चंद्रकांत पाटील यांचे बाबरी बद्दलचे वक्तव्य हे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले. या घटनेचे भाजपने एकट्याने कधीच श्रेय घेतले नाही. भविष्यात घेणार नाही. ती कारसेवक आणि हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. सर्व हिंदू एकत्र रहावेत म्हणून 500 वर्षांपासूनची मागणी होती. या कार्यात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मोलाची होती. त्यांचा आम्ही सन्मान करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र,उद्धव ठाकरे यांचे या अभियानात योगदान काय होते, असा सवालही त्यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम