नुकसानग्रस्त शेतकरी चे उपोषण, आमदारांच्या आश्वासनाने उपोषणाची सांगता

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी 

वादळी पावसाने नुकसान नुकसान होऊन तिन वर्ष लोटले तरी शेतकर्याना शासनाकडुन दमडीही मिळाली नाही. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आज तहसिल कार्यालयासमोर उपोषणला बसले होते. उषोषणाला आमदार कीशोर पाटील यांनी भेट देत एक महीन्याच्या आत शासनाकडुन भरपाई मिळवून देण्याचे आश्वादिल्यानंतर शेतकर्यानी उपोषण मागे घेतले.
—————-
भडगाव तालुक्यात 11 जुन 2019 ला मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. त्यात 8-10 खेड्यातील 852 शेतकर्याचे 567 हेक्टरवरील केळी व फळबागा उध्वस्त झाल्या. त्यामुळे शेतकर्याचे आतोनात नुकसान झाले. त्यावेळी तत्कालीन  पालकमंत्री गिरीश महाजन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. त्यानंतर आमदार कीशोर पाटील यांनी ही यबाबात सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र तिन वर्ष होत आले तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही. 26 एप्रिल 2022 रोजी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दालनात या संदर्भात बैठक झाली. त्याच्यां सुचेनेनुसार सुधारीत प्रस्ताव ही पाठविण्यात आला आहे. मात्र त्यावर काहीएक हालचाल होतांना दिसत नाही. वादळात 10 -15 वर्ष जगवलेले फळबागा उध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भरपाई केव्हा मिळेल? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकर्याकडुन विचारला जात होता. याबाबत शेतकर्याकडून निवेदन देण्यात आले होते. भरपाई न मिळाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला होता. आज तहसिल कार्यालयासमोर दिपक महाजन,पत्रकार सुधाकर पाटील (वडजी), विनोद बोरसे, सीमा पाटील (पिचर्डे) व्ही.एस.पाटील, भिमराव पाटील ( घुसर्डी),प्रविण पाटील(शिवणी), उत्तम पाटील, सरपंच भास्कर पाटील, विनोद पाटील(बात्सर), स्वदेश पाटील, भाऊसाहेब परदेशी,समाधान पाटील(वडजी) विश्वास पाटील ( निंभोर), कांतीलाल पाटील (कोठली), पी.डी.माळी (बोरनार) देविदास पाटील, विजय पाटील, सरपंच पप्पु पाटील(पाढंरद)आदि शेकडो शेतकरी उपोषणाला बसले होते.

आमदारांचे आश्वासन अन् उपोषण मागे

आमदार कीशोर पाटील यांनी दुपारी उपोषणाला भेट दिली. त्यांनी शेतकर्याशी चर्चा करत एक महीन्याच्या आत झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. उद्या मुख्यमंत्र्याची भेट घेऊन तेथे राज्याचे मदत पुनर्वसन मंत्र्याना बोलावून तातडीने खास बाब म्हणून शेतकर्याना मदत मिळवून देण्याचे आश्वासन शेतकर्याना दिले. दोन वर्ष कोरोना त्यानंतर झालेले सत्तांतर मुळे ही मदत लांबल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले. मात्र आता एक महीन्याच्या आत शेतकर्याना मदत मिळवून देऊन न्याय देऊ असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तहसिलदार मुकेश हीवाळे, तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोर्डे हे उपस्थीत होते.
————–

उपोषणाला मोठ्याप्रमात सर्व पक्षीय पाठींबा

दरम्यान शेतकर्यांच्या या पाठीब्यांला भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी भेट घेत शेतकर्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातुन मदत देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय भाजपचे जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, भ्रष्टाचार निर्मूलन समीतीचे विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, शिवसेनेचे जे.के.पाटील ( ठाकरे गट) पथराडचे सरपंच भाऊसाहेब पाटील, पत्रकार अशोक परदेशी, चर्मकार महासंघाचे पांडुरंग बावीस्कर याच्यांसह अनेकांनी भेट देत पाठींबा दिला.
———
प्रतिक्रीया
तिन वर्ष झाली तरी शेतकर्याना नुकसान भरपाई मिळत नसल्याने आम्ही सर्व शेतकरी उपोषणाला बसलो होतो.आमदार कीशोर पाटील यांनी एक महीन्याच्या आत शेतकर्याना भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेतले आहे. भरपाई मिळाल्यास त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू. तर पाठींबा देणार्या सर्वाचे मनापासून आभारी आहोत.
-सुधाकर पाटील शेतकरी

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम