पतीने केला पत्नीचा खून : कारण वाचून बसेल धक्का !
बातमीदार | १९ सप्टेंबर २०२३
भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे वाढीव नऊ दरवाजांच्या कामासाठी आलेल्या मजुराने स्वतःसाठी पिण्यास आणलेली दारू पत्नीने पिल्याचा राग आल्याने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना शवविच्छेदनानंतर उघडकीस आली. शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी परराज्यातील मजूर कामासाठी रहिवास करीत आहे. यापैकी जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दोघे देखील या ठिकाणी मजुरीचे काम करतात. रविवारी दुपारी जितेंद्र याने स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू पत्नी व शेजारी असलेल्या करणी शिवराम यादव या दोघांनी पील्याने शांतिदेवीचे पती आरोपी जितेंद्र गंगाराम हेमब्रम याला राग आला. त्याने पत्नी शांतीदेवीला रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मारहाण केली. यानंतर दारूच्या नशेत तिचा गळा दाबला. यानंतर सायंकाळी साप चावल्याचे कारण करत वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश उगले यांना मयत महिलेच्या अंगावर साप चावल्याचे कोणतेही खुण दिसून आले नाही यामुळे सोमवारी सकाळी मयत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये गळा दाबला असल्याचा उघड झाले यामुळे वरणगाव पोलीस स्टेशनचे सहा. निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र गंगाराम हेमब्रम वर गुन्हा दाखल करण्यात आला.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम