लग्नसराईच्या पूर्वीच सोन्यासह चांदीच्या दरात वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३

देशभरात महागाईचा डोंगर नेहमीच वाढत असतांना आता सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. दिवाळी संपत आल्यावर लग्नसराईला सुरुवात होत आहे. याच काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढल्याने ग्राहकांना पुन्हा टेन्शन आले आहे. सोन्याच्या दरात सतत पतझड पाहायला मिळते. अशातच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे.

लग्नसराईच्या काळात दागिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. मागच्या आठवड्यात सोन्यात १२०० रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीतही ४,१०० रुपयांनी दर वाढला. काल सोन्याच्या दराने ६२ हजारांचा टप्पा गाठला होता. अशातच आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आखाती देशातील युद्धाचा परिणाम हा पेट्रोल -डिझेलसह धातूंवर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला आहे. काल सोन्याच्या दरात ३८० रुपयांनी वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७०० रुपये मोजावे लागणार आहे. तसेत २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,१७० रुपये मोजावे लागतील. तसेच चांदीच्या किमतीत घट झालेली पाहायला मिळाली. आज प्रतिकिलो चांदीसाठी ७६,००० रुपये मोजावे लागतील.

मुंबई- ६२,०२० रुपये

पुणे – ६२,०२० रुपये

नागपूर – ६२,०२० रुपये

नाशिक – ६२,०५० रुपये

ठाणे – ६२,०२० रुपये

अमरावती – ६२,०२० रुपये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम