अश्लीलतेचा कळस : विवस्त्र करून तरुणीला नाचवले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ नोव्हेबर २०२३

राज्यभर दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना अनेक ठिकाणी विविध परंपरेनुसार अनेक कार्यक्रम घेतले जातात पण सध्या भंडारा जिल्ह्यातील अनेक गावांत मंडई उत्सवाचे आयोजन केले असून यात पूर्वी तमाशा, नाटके सादर होणाऱ्या या उत्सवात आता अश्लीलतेने कळस गाठल्याचे समोर आले आहे. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी या गावात नृत्य करताना तरुणी चक्क विवस्त्र झाली. विवस्त्र होत नृत्य करत असताना काही टवाळखोरांनी तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ती स्टेजच्या खाली कोसळली. शरमेने मान खाली घालाव्या लागणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भंडारा जिल्ह्यातीलच मोहाडी तालुक्यातही अशीच घटना समोर आली आहे. येथील बीड या गावातही मंडई उत्सवात तरुणींनी अश्लील डान्स केला. पंचायत समिती सभापतीनेच नाचणाऱ्या मुलींवर पैसे उधळले. तसेच, हे सभापती अजितदादा गटाचे पदाधिकारी असल्याचेही समोर आले आहे.

तुमसर तालुक्यातील नाका डोंगरी येथे तरुणीला विवस्त्र नाचवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 18 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच हा प्रकार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या नृत्य कार्यक्रमासाठी नागपूरहून डान्स हंगामा पार्टीच्या नृत्यांगनांना पाचारण करण्यात आले होते. रात्री डान्स हंगामाचा कार्यक्रम सुरू झाला. सुरवातीला लावण्या सुरू होत्या. मात्र, रात्री 2 वाजेनंतर अश्लीलतेचे प्रकार सुरू झाले. या उत्सवात नृत्य करणाऱ्या एका तरुणीने एक एक करीत अंगावरील वस्त्र काढण्यास सुरूवात केले आणि क्षणातच ती विवस्त्र झाली. तरुणीने विवस्त्र अवस्थेतच नृत्य करण्यास सुरुवात केली. तरुणी विवस्त्र होताच काही टवाळखोर तरुणांनी तरुणीची छेड काढण्यास सुरवात केली. काहींनी तरुणीला स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. काही वेळाने डान्स करणारे तरुण तरुणी अचानक तोल जाऊन स्टेज खाली पडले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम