भारतीय संघाने आखला तब्बल २ वर्षाचा प्लान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ जून २०२३ । जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने दोन्ही अंतिम फेरीत धडक मारली खरी पण त्यांना दोन्ही वेळा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. आता 2023 ते 2025 दरम्यानच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची तयारी भारतीय संघाला आतापासूनच करावी लागणार आहे.

या दौऱ्याची सुरुवात जुलैमधील वेस्ट इंडिज दौऱ्याने होणार आहे. पुढील दोन वर्षांतही भारतीय संघाची ‘अग्नीपरिक्षा’ असणार आहे.’डब्ल्यूटीसी’ची सुरुवात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘ॲशेस’ मालिकेद्वारे होणार आहे. यातील पहिली कसोटी 16 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. येथे भारत-विंडीजदरम्यान दोन कसोटींची मालिका होणार आहे. या कसोटी डॉमिनिका (12ते 16 जुलै) आणि त्रिनिदाद (20 ते 24 जुलै) येथे होणार आहेत.

भारताचे ‘डब्ल्यूटीसी’ साठीचे वेळापत्रक
भारत वि.वेस्ट इंडिज – जुलै 2023 – विंडीजमध्ये (दोन कसोटी)
भारत वि.दक्षिण आफ्रिका – डिसेंबर-जानेवारी – दक्षिण आफ्रिकेत (दोन कसोटी)

भारत वि.इंग्लंड – जानेवारी ते फेब्रुवारी 2024 – भारतात (पाच कसोटी)
भारत वि. बांगलादेश – सप्टेंबर ते ऑक्टोबर 2024 – भारतात (दोन कसोटी)
भारत वि.न्यूझीलंड – ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 – भारतात (तीन कसोटी)
भारत वि.ऑस्ट्रेलिया – नोव्हेंबर ते जानेवारी 2025 – ऑस्ट्रेलियात (पाच कसोटी)

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम