
हवाईसुंदरीच्या मारेकऱ्याने पोलीस कोठडीत घेतला गळफास !
बातमीदार | ९ सप्टेंबर २०२३ | प्रशिक्षणार्थी हवाईसुंदरी रुपल ओग्रे हिची अंधेरी येथील घरात गळा चिरून हत्या करणारा आरोपी विक्रम अटवाल (४०) याने शुक्रवारी पहाटे अंधेरी पोलिस ठाण्यातील कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटवाल याला अटक केल्यानंतर पुढील तपासासाठी पवई पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अंधेरी पोलिस ठाण्याच्या स्वच्छतागृहात अटवाल गेला. मात्र बराच वेळ झाला तो बाहेर न आल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावला परंतु, काहीच प्रतिसाद न आल्याने स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा पाण्याच्या पाइपलाइनला अटवालने स्वतःच्या पॅन्टने गळफास घेतल्याचे दिसून आले. पोलिसांच्या माहितीनुसार, अटवालला अटक केल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. दोन दिवसांनंतर त्याच्या वागणुकीत कमालीचा बदल झाला होता. कारण तो शांत झाला. तसेच कोठडीत असताना त्याचे रडणेही थांबले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम