अजितदादांच्या ‘त्या’ प्रश्नावर शिंदे गटाच्या नेत्याने दिले उत्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ मे २०२३ ।  राज्यात नुकतीच महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवारांच्या या टीकेवर आता शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले तर अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री पद व अर्थ खाते गेल्याने सध्या त्यांचा थयथयाट सुरू आहे अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना गुळाचा मुख्यमंत्री बनवून राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोट्यवधींचा निधी दिला आणि त्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले असे म्हणत अजित पवार यांच्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. निवडणुका घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहोत, पण ज्यावेळी तुम्ही सत्तेत होता त्यावेळी निवडणुका का घेतल्या नाहीत?

असा सवाल रामदास कदम यांनी केला. दुसऱ्याकडे एक बोट केले तर चार बोटे आपल्याकडे दाखवत असतात याचे भान अजित पवार यांनी ठेवावे, असा सल्ला रामदास कदम यांनी यावेळी दिला. काय म्हणाले होते अजित पवार? माझा शेतकरी तिथे अडचणीत आहे, पण त्यांना मदत करण्याची सरकारीच भूमिका नाही. शिंदे

फडणवीस काय करत आहेत?

त्यांचं काम नाही का? शेतकऱ्यांची पिक उद्धवस्त झाली आहेत, परंतु, त्यांना मदत करण्याची भूमिका या सरकारची नाही. फडणवीस शिंदे काय करत आहेत, त्यांचं हे काम नाही का? पण यांना बाकीच्या कामांमध्ये रस आहे, अशी टीका अजित पवारांनी वज्रमूठ सभेतून केली. सरकारला 10 महिने झाले आहे, पण हे सरकार निवडणूक घेत नाही. या सरकारला निवडणुकींची भीती वाटत आहे. निवडणुका का घेत नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेत नाही.
भीती कशाची वाटत आहे. का तुम्ही निवडणुका जाहीर करत नाही. आता तर पाऊसपण नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर जनता काय करेल, याचा विश्वास या सरकारला नाही. म्हणून शिंदे सरकार निवडणुका घेत नाही, असा आरोपही अजित पवारांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम