ठाकरे गटाच्या नेत्याची राणेवर खोचक टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मे २०२३ ।  राज्याच्या राजकारणात भाजपचे राणे परिवाराने ठाकरे गटावर टीका केल्यानंतर लागलीच ठाकरे गटाचे नेतेही राणे परिवारावर तुटून पडत टीका करीत आहे. यात आता ठाकरे गटाचे पदाधिकारी शरद कोळी यांनी टीका केली आहे. त्यांनी थेट बाळासाहेबांचे विधान सत्य होते अशीच यावेळी टीका करीत राजकारणात खळबळ माजविली आहे.

खरा हिजडा नारायण राणे आहे. नारायण राणे यांची कंपनी हिजडी आहे. नारायण राणे यांना उद्देशून बाळासाहेब ठाकरे यांनी ते विधान केले होते. त्याचे कारण म्हणजे शिवसेनेला सोडून नारायण राणे हे सोनिया गांधी यांच्या चपला उचलण्याचे काम करत होते. म्हणून नारायण राणे यांना हिजड्याची उपमा दिली होती. बाळासाहेबांनी दिलेली उपमा १०० टक्के योग्य आणि बरोबर आहे. हिजड्याला बाळासाहेब हिजडाच म्हणणार. म्हणजेच नारायण राणे हिजड्याची कंपनी आहे, असा हल्लोबोल ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केला.

शरद कोळी म्हणाले, मातोश्रीवर गुजराती चालतात. सगळेच गुजराती गद्दार नाहीत. मोदी आणिशाहनसारखे काही गुजराती आहेत मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जातिवादी औलादींना कवडीची किंमत नाही. त्यामुळे मातोश्री आणि शिवसैनिक शिंदे कंपनी, फडणवीस आणि राणे, गृहमंत्री या सगळ्यांना आम्ही फाट्यावर मारतो. राणे यांच्या डोक्यावर खरंच परिणाम झाला आहे. त्यांना खरंच उपचार करावे लागतात. त्यांना कोणाला जमत नसेल, तर आम्ही आता त्यांना ओढून आणून उपचार करायची वेळ आली आहे. लव जिहाद साहेबांचा नाही, तर लव जिहाद राणे कंपनीने केला आहे. शिवसेनेला सोडले, काँग्रेसबरोबर झकमारी केली. काँग्रेसला सोडले आणि आता भाजपबरोबर गेले आहे. आता त्याच्याबरोबर तरी नीट राहा म्हणून सांगा. परत अजून दुसऱ्याचा हात धरून कोणाबरोबर जाऊ नका. नारायण राणे आता तरी नीट राहा. किती आगाऊपणा करशील? तुझी उंची किती? तू बोलतो किती? तुझ्या औकातीत राहा. आता शिवसैनिकांच्या तू डोक्यावरून चालला. शिवसैनिकांनी काही उलट सुलट केल्यावर वाईट वाटून घेऊ नको, अशा शब्दात शरद कोळी यांनी नितेश राणेंना फटकारले. आदित्य ठाकरे हे नितेश राणे यांचा बाप आहे. आदित्य ठाकरे यांच्या नादाला लागायचं नाही. अरे बिगर दाढी मिशाच्या, तुला काही कळते का? डोक्याचा भाग आहे का? याचे लग्न कसे काय झाले? हेच मला काही कळत नाही. धी मिशा तरी येऊ दे आणि मग बोल, अशी समज शरद कोळी यांनी नितेश राणे यांना दिली. नितेश राणे नेपाळी दिसतो, हे मी काय सगळे महाराष्ट्रातले लोक आणि बाहेरच्या राज्यातले लोकही सांगतील. हा नेमका महाराष्ट्राचा आहे की नेपाळचा आहे. नेपाळीसारखा दिसल्यावर नेपाळी नाहीतर गुजराती म्हणू का?, असा सवाल शरद कोळी यांनी विचारला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम