सोन्यासह चांदीच्या दराने घेतली चकाकी ; जाणून घ्या आजचे दर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून मोठ्या संख्येने लग्नसराईचे मुहूर्त असल्यामुळे सोने खरेदीकरांची बाजारपेठेत गर्दी दिसून येते. जर तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असेल. कारण सराफ बाजारात सोन्याच्या किंमतीत कालच्या तुलनेत वाढ झाली असून आद 22 कॅरेट सोन्याचे दर 51,600 रुपये प्रती तोळा आहे तर काल (28 फेब्रुवारी) त्या अंदाजाने 51,500 रुपये प्रती तोळा सोने विकले गेले. बघायला गेले तर सोन्याच्या किंमतीतल कालच्या तुलनेत 100 रुपयांनी वाढ झाली आहे.

दरम्यान केंद्र सरकारने 1 फेब्रुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीचे दर वाढण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बजेटच्या दुसऱ्या दिवशी जीएसरटीसह सोन्याचे 24 कॅरेट दर प्रतितोळा 60,500 रुपये, तर चांदी प्रतिकिलो 70 हजार रुपये (GST) झाली होती. मात्र आता सोन्याचे दर 57,200 रुपये प्रतितोळा (GSTसह) तर चांदी 64,200 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. परिणामी सोने दर 60 हजारांच्या घरात गेल्याने सोने खरेदी नियोजन असलेल्या ग्राहकांनी वेट अँड वॉच चे धोरण स्वीकारले होते.

शहर 24 कॅरेट (रु.) 22 कॅरेट (10 ग्रॅम)
दिल्ली 56,170 51,500
मुंबई 56,020 51,350
चेन्नई 52, 285 47, 927
कोलकाता 56,020 51, 350

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम