उन्हाळ्यात या टिप्स करा फोलो ; एसीचे इलेक्ट्रिसिटी बिल येणार कमी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ मार्च २०२३ । आजपासून राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा पार वाढू लागला आहे. प्रत्येक घरासह कार्यालयात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात एसी, कूलरचा वापर होत असतो त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात इलेक्ट्रिसिटी बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. उन्हाळ्यातील चार ते पाच महिने जास्त बिल भरताना आपलं घरखर्चाचं बजेट कोलमडू शकतं. म्हणजेच नवीन एसी खरेदी करणं खूप सोपं आहे पण, त्यामुळे येणारं बिल भरणं कठीण आहे. जर तुम्हीदेखील एसीच्या वाढत्या बिलामुळे वैतागलेले असाल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने वीज बिल खूपच कमी येईल,

एका रिपोर्टनुसार एसीचं तापमान एक अंशाने वाढल्यास वीज बिलात सुमारे 6 टक्के बचत होते. तुम्ही डीफॉल्ट तापमानात एसी चालवल्यास, तुम्ही तुमचं वीज बिल 25 टक्के कमी करू शकता.
जर तुम्ही घरी एसी वापरत असाल तर सीलिंग फॅनचाही वापर करावा. एसीसोबत सीलिंग फॅन चालवल्यास संपूर्ण खोलीत हवा व्यवस्थित पसरते आणि जास्त वेळ एसी लावण्याची गरज नसते. त्यामुळे एसीचं वीज बिल कमी होतं.

जर तुम्ही एसी सर्व्हिसिंग करण्याबाबत निष्काळजी असाल तर तुम्ही त्याबाबत खबरदारी घ्यावी. तुम्ही एसी सर्व्हिस नियमितपणे करून घ्यायला हवी. यामुळे व्हेंट आणि डक्टमध्ये साचलेली घाण साफ होते. जर तुम्ही एसीचं सर्व्हिसिंग करून घेतलं नसेल, तर एसीला हवा फेकण्यासाठी किंवा पसरवण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागते आणि त्यामुळे विजेचा वापर 5 ते 15 टक्क्यांनी वाढतो.

एसी लावताना खोली नेहमी बंद ठेवा. यामुळे थंड हवा खोलीबाहेर जाणार नाही आणि तुमची खोली कमी वेळात थंड होईल. त्यामुळे एसीवर लोड पडणार नाही आणि वीज बिलही कमी येईल. आता तुम्ही एसी वापरत असाल तर तुम्ही टीव्ही किंवा कॉम्प्युटर वापरू नये कारण ही उपकरणं जास्त उष्णता निर्माण करतात. त्यामुळे खोली थंड करण्यासाठी एसीला आणखी काम करावं लागतं आणि त्यासाठी वीजही जास्त लागते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम