‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांने ‘या’ कारणाने घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ ।  देशात गेल्या काही दिवसापासून ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तुफान चर्चा रंगत असून आता आदिपुरुषच्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशातील 6 राज्यांमध्ये निर्मात्यांविरोधात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत, निर्माता भूषण कुमार आणि संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

या आदेशाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार होती, मात्र सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या आदेशानुसार ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या वकिलांना म्हणाले – न्यायालय यादीत नसलेल्या प्रकरणांची सुनावणी करत नाही. तुम्ही आधी सगळ्या खटल्यांची यादी बनवून आणा. त्यानंतरच या खटल्याची सुनावणी होऊ शकते. तुमच्यासाठी इथे अपवाद नाही. आदिपुरुष चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सलग तीन दिवस सुनावणी घेतली. रामायण, ज्यांच्या पात्रांची पूजा केली जाते, ते विनोदी कसे दाखवण्यात आले, असे न्यायालयाने म्हटले. सेन्सॉर बोर्डाने असा चित्रपट कसा पास केला? चित्रपट पास होणे ही घोडचूक आहे. चित्रपट निर्मात्यांना फक्त पैसे कमवायचे असतात कारण पिक्चर हिट होतो.

चुकीच्या गोष्टी दाखवणारा कुराणवरील एखादा माहितीपट बनवा म्हणजे काय होऊ शकते ते कळेल. तुम्ही कुराण, बायबलला हात लावायला नको. मी स्पष्ट करतो की कोणत्याही धर्माला हात लावू नका. कोणत्याही धर्माचे चुकीचे वर्णन करू नका. न्यायालय कोणत्याही धर्माचे पालन करत नाही. न्यायालय सर्व लोकांच्या भावनांचा आदर करते. आदिपुरुष चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी शनिवारी, 8 जुलै रोजी लोकांची माफी मागितली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले. ‘त्यांच्या चित्रपटातून जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यासाठी तो बिनशर्त माफी मागत आहेत. चित्रपटातील वादग्रस्त संवादांवर त्यांनी पहिल्यांदाच आपली चूक मान्य केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम