मराठा समाजाने आखला मोठा प्लान : मंत्री भुजबळ यांना देणार प्रतिउत्तर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १८ नोव्हेबर २०२३

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर आता राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे पण अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. जालन्यातील अंबड येथील ओबीसी एल्गार मोर्चात त्यांनी जरांगे यांच्या शाब्दिक हल्ला चढवला. यावरून आता मराठा समाज आक्रमक झाला असून छगन भुजबळांना प्रतिउत्तर देण्यासाठी जालन्यात मोठा प्लान आखण्यात आला आहे.

मनोज जरांगे यांच्यावर छगन भुजबळ यांनी केलेली टीका मराठा समाजाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भुजबळांना प्रतिउत्तर देण्यासाठी जालना शहरात पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात येणार आहे. १ डिसेंबर रोजी ही सभा होणार असून सभेआधी शहरात रॅली काढण्यात देखील काढली जाणार आहे. जालना शहरात आयोजित केली जाणारी सभा राज्यभरात रोल मॉडेल म्हणून राबवली जाणार आहे.

या सभेला जवळपास १२ ते १५ लाख मराठा बांधव येणार असल्याची माहिती मराठा संघटनांनी दिली आहे. त्यामुळं आता या सभेत मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका मांडणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. पोलिसांनी या सभेला परवानगी दिली की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाजाने घोषणाबाजी केली आहे. काही ठिकाणी भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेही मारण्यात आले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम