मराठ्यांना वेड्यात काढतात ; मनोज जरांगे पाटील !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ नोव्हेबर २०२३

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे तर दुसरीकडे सरकारने सर्व पक्षीय नेत्याची बैठक घेत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पाय उचलले आहे तर यावेळी सर्वच पक्षीय नेत्यांनी याला साथ देखील दिली आहे.

कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून मराठा आरक्षण तात्काळ देण्यात यावं, यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन पीण पिण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती आता थोडी बरी आहे. अन्न-पाणी सोडल्यामुळे आंदोलनाच्या सहाव्यादिवशी मनोज जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले होते. पण त्यानंतर मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पाणी पिण्यास सुरुवात केलीय. राज्यात जाळपोळ, तोडफोड अशा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम