तुमचे नवीन प्रेम प्रकरण घडणार आहे. वाचा राशिभविष्य !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ नोव्हेबर २०२३

मेष  : आर्थिक फायदा संभवतो. इतरांना दुखावून नका आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष द्या.

वृषभ : खर्च वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपली ध्येयं, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी चांगला दिवस. या कामी आपल्या मित्रांची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचे मनोधैर्याला चालना मिळेल आणि तुमचे उद्दिष्ट गाठण्यास मदत होईल. जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

मिथुन : धन धार्मिक कार्यात लावू शकतात. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. काही लोकांसोबत वादात अडकू शकतात. जोडीदारावर कामाचा ताण येईल.

कर्क : खर्च भागतील. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन लाभेल. वैवाहिक आयुष्यात तुम्हाला आज एक बदल जाणवणार आहे.

सिंह: आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा.

कन्या  : धन कमावण्यात यशस्वी व्हाल. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल.

तूळ : धन लाभ होऊ शकतो. इतरांच्या कामापासून दूर रहा. प्रेरित होऊन तसेच समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यावसायिकांना बढती आणि आर्थिक फायदा मिळेल. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. कुटुंबातील सदस्य तुम्हाला सकारात्मकदृष्ट्या प्रतिसाद देतील. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल. कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो, त्याला एक साधे ‘हॅलो’ केलेत तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे.

धनु : आर्थिक पक्ष चांगला राहील. उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे. एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो.

मकर : आर्थिक आघाडीवरील सुधारणा. कुटूंबातील सदस्यांसोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.

कुंभ : आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एक सरप्राईझ आखा आणि आजचा दिवस तुमच्या आय़ुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. आज कार्य क्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात.

मीन : आर्थिक स्थिती सामान्य. रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम