राज्यात उन्हाचा पारा वाढला ; हवामान विभागाचा अंदाज !
दै. बातमीदार । १९ मे २०२३ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील उन्हाचा पारा वाढला असून जळगाव जिल्ह्यात देखील याचे परिणाम पाहायला मिळाले आहे. ढगाळ वातावरणामुळे उकाडा कमालीचा वाढला आहे. आज कमाल तापमानात चढउतार कायम राहण्याची शक्यता असून पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सोमवारी विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यासह देशात अनेक राज्यांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. दरम्यान राज्यात विदर्भ, आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमानही 40 अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. कोकण किनारपट्टीवर कमाल तापमान कमी असले तरी आर्दता अधिक आहे. परिणामी, उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. विदर्भातील अमरावती व वर्धा जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 42.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान होते.
पुणे ३८.५ (२३.४), जळगाव ४०.५, धुळे ४०, कोल्हापूर ३७.६ (२२.६), महाबळेश्वर ३२.९ (१९.२), नाशिक ३७ (२२.१) निफाड ३८.६ (२३.८), सांगली ३९.२ (२२.९), सातारा ३९.४ (२२.२), सोलापूर ४०.७ (२६.२), सांताक्रूझ ३३.२ (२६.६), डहाणू ३४ (२७.४), रत्नागिरी ३४.६ (२६.५),
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम