महसूल मंत्र्यांनी ग्रामस्थांपुढे टेकले हात ; वाळू माफियांना बसणार चाप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ मे २०२३ ।  राज्यातील मोठ्या प्रमाणात वाळूमाफिया सक्रीय असल्याने त्या वाळूमाफियांनी जनतेपासून नेत्यांच्या डोक्याला ताप दिला आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वाळू चोरी रोखण्यासाठी नवीन नियम काढले होते. पण आता त्यांनी देखील ग्रामस्थांपुढे हात टेकले आहे.

ग्रामस्थांचा वाळू लिलावास विरोध असेल तर शासन वाळूचा लिलाव करणार नाही, असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. त्यानंतर वाळूला नेण्यास विरोध करणाऱ्या मुळाकाठ परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

शासनाने जाहीर केलेल्या नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथील मुळा नदीपात्रातून वाळू लिलाव व निंभारी येथील वाळू डेपोच्या विरोधात मुळा काठ परिसरातील गावांनी गाव बंद ठेवून गुरुवारपासून दि ११ रोजी करजगाव-नेवासा रस्त्यावरील लक्ष्मीआई चौकात आंदोलन सुरू केले होते. वाळूचा एक खडाही उचलू देणार नाही तसेच महसूल विभागाकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार या ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे महसूल विभागापुढे पेच निर्माण झाला होता. महसूल विभाग कुठलीही भूमिका घेत नसल्यामुळे मुळाकाठ परिसरातील तरुणांनी मंत्री विखे-पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आंदोलक लोणीकडे निघाले असता, त्यांना पानेगाव-मांजरी येथील मुळानदी पात्रावरील पुलावर पोलिसांनी रोखले.

यावेळी अधिकारी व आंदोलक यांच्यात पुन्हा चर्चा झाली. महसूल अधिकारी यांनी मंत्री विखे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधत घटनेविषयी माहिती दिली. यावेळी आंदोलकांशीही विखे-पाटलांनी फोनवर चर्चा केली. यावेळी विखे-पाटील यांनी महसूल अधिकाऱयांना मुळाकाठ परिसरातील नदीपात्रातील वाळू लिलाव व डेपोची निविदा प्रक्रिया व उत्खनन करण्यास स्थगिती देण्यासंदर्भात सूचना दूरध्वनीवरून दिल्या. त्यानंतर मुळाकाठ परिसरातील नदीपात्रातील वाळू लिलाव होणार नाहीत, असे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी जाहीर केले. वाळूच्या प्रश्नावर राजकारणविरहित मुळाथडी परिसरातील गावे एकवटलेली दिसून आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम