मोदी सरकारने त्या आरोपाची चौकशी करावी ; शरद पवार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात सभा घेत असून आज सकाळी शरद पवारांनी पत्रकाराशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास आबीसीमधील गरीब लोकांवर एका प्रकारे अन्याय होईल, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

राज्यात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागितली म्हणजे आदेश त्यांनीच दिले होते, अशी एका प्रकारे त्यांनी कबुली दिली असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी आता राजीनामा देण्याची मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे. ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर एका प्रकारे अन्याय होणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांची सरकारने चौकशी करावी. त्या आरोपांवर आधी उत्तर द्या. पंतप्रधानी त्या आरोपांची वस्तुस्थिती सांगावी, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे. नसता असे आरोप करु नये, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम