या गार्डनचे नामफलक हटविले बुलडोझरच्या सहाय्याने ; नवीन नावाची घोषणा !
दै. बातमीदार । २९ जानेवारी २०२३ । केद्रातील भाजप सरकारने दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डनचे नामकरण अमृत उद्यान असे करण्यात आले आहे. मुघल गार्डनला आता अमृत उद्यान असे नाव देण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतल्याची माहिती राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय सिंह यांनी दिली आहे.
या निर्णयानंतर बुलडोझरच्या सहाय्याने मुघल गार्डन या नावाचा फलक हटवण्यात आला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Welcome welcome welcome
दिल्ली-मुगल गार्डन का नाम बदला गया pic.twitter.com/Eet0NwURBk
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) January 28, 2023
मुघल गार्डनचे नाव बदलण्याच्या निर्णयानंतर एनडीएमसीचे कर्मचारी बुलडोझरमधून ‘मुघल गार्डन’चे बोर्ड हटवण्यासाठी दाखल झाले होते. मुघल गार्डनचे नाव बदलून अमृत उद्यान नावाचा बोर्ड लावण्यात आला. इतकंच नाही तर मुघल गार्डनच्या आतील फलकावर लिहिलेलं नावही बदलून अमृत उद्यान करण्यात आलं आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा अमृतकालमधील मोदी सरकारचा आणखी एक ऐतिहासिक निर्णय आहे. राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’ आता ‘अमृत उद्यान’ म्हणून ओळखले जाणार आहे, असंही ते म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम