राष्ट्रवादीच्या आमदाराने बापाला काढले घराबाहेर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ एप्रिल २०२३ । राज्याला काका-पुतणे असे राजकारण लाभल्याने अनेक काकांचे व पुतण्याचे राजकीय वाद राज्यात दिसून आला आहे. असाच वाद बीड जिल्ह्यात देखील पाहायला मिळाला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते असलेले आ.क्षीरसागर यांच्यावर वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण ?
तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले, असे म्हणत बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करत घराबाहेर हाकलून दिल्याचा प्रकार नगर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी सकाळी घडला. याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात आ. संदीप क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
रवींद्र क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी बहिणी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घरी आल्या . त्यावेळी आ. संदीप क्षीरसागर व अर्जुन क्षीरसागर यांनी, तुम्ही बहिणींना घरी का येऊ दिले, असे म्हणत माझी कॉलर धरून धक्काबुक्की केली. मला व बहिणींनाही हाकलून दिले. या तक्रारीवरून आ. संदीप क्षीरसागर व अर्जुन क्षीरसागर या दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम