ग्रामीण भागात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जोमात !
दै. बातमीदार । ५ मे २०२३ । देशात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढला आहे. भारतात ७५.९ काेटी सक्रिय इंटरनेट वापरकर्ते असून महिन्यातून किमान एकदा तरी इंटरनेटचा वापर करतात. म्हणजेच निम्मयाहून अधिक लाेकांकडे इंटरनेट आहे. चालू वर्षाच्या अखेरीस हा आकडा ९० काेटी एवढा हाेण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, ग्रामीण भागात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
२०२२ मध्ये महिला वापरकर्त्यांमध्ये माेठी वाढ झाली. नव्या युझर्समध्ये ५७% महिला हाेत्या. हा आकडा २०२५ पर्यंत ६५% एवढा असू शकताे. एकूण युझर्समध्ये ५४% पुरुष आहेत. शहरांमध्ये इंटरनेट वापरकर्त्यांची वाढ खुंटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शहरी भागात ७१ टक्क्यांपर्यंत इंटरनेटची पाेहाेच आहे. मात्र, या ठिकाणी केवळ ६ टक्के वाढ झाली आहे. तर ग्रामीण भागात १४ टक्के वाढ झाली आहे.
कशाला पसंती?
इंटरनेटचा वापर मनाेरंजन, साेशल मीडिया, संवाद, ई-काॅमर्स इत्यादींसाठी माेठ्या प्रमाणावर हाेताे. ई-काॅमर्समध्ये दरवर्षी ५१% वाढ हाेत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम