
सोशल मिडीयावर अभिनेत्याचा आक्षेपार्ह विधान !
बातमीदार | १४ ऑगस्ट २०२३ | सध्या दिग्गज नेते मंडळी असो वा अभिनेते सर्वच प्रसिद्ध व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील लाईव्ह स्ट्रीमिंगचा वापर करीत असतात. पण याच कार्यक्रमात एका अभिनेत्याच्या विरोधात जातीवाचक शब्द वापरून आक्षेपार्ह विधान केल्याने तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा अभिनेता एका राजकीय पक्षाचा संस्थापक असल्याची माहितीही मिळत आहे.
या अभिनेत्याचं नाव उपेंद्र असून तो कन्नड अभिनेता आहे. त्याने उत्तम प्रजाकिया पार्टी नावाचा राजकीय पक्षही स्थापन केला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, उपेंद्र याने एका लाईव्ह स्ट्रीमिंगवेळी जातीवाचक शब्द वापरून त्यावर आक्षेपार्ह विधान केलं. तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका होऊ लागली.
या विधानाचा दलित संघटनांनी विरोध केला आहे. सगळीकडून होणाऱ्या विरोधानंतर बेंगळुरू येथील सीके अचुकट्टू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर अजून एक तक्रार दाखल करण्यात आली. प्रकरण वाढल्यानंतर उपेंद्र याने माफीही मागितली आहे. उपेंद्रचं पूर्ण नाव उपेंद्र राव आहे. तो अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक आणि राजकारणीही आहे. तो प्रामुख्याने कन्नड चित्रपटांमध्ये काम करतो. त्याखेरीज तेलुगू चित्रपटातही तो झळकला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम