अभिनेत्रीने मुलीचे फोटो केले व्हायरल ; मुलीसोबत घालवत आहे वेळ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ नोव्हेबर २०२२ । सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सध्या आई होण्याचा आनंद घेत आहे. आपल्य लाडक्या मुलीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी ती सोडत नाही. ती अनेकदा तिची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत फोटो शेअर करत असते. मात्र या फोटोत ती तिचा चेहरा स्पष्ट दिसू देत नाही. त्यामूळे काही वेळा तिचे फॅन्स तिच्यावर नाराजही होतात. पण आज काही वेगळ चित्र पाहायला मिळतयं. प्रिंयकावर आणि तिच्या लेकीवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

त्याचे कारणही तितकेच खास आहे. प्रियंकाने तिच्या चाहत्याची सकाळ गोड करण्यासाठी मालतीचा नवीन फोटो पोस्ट केलायं. बुधवारी पहाटे प्रियांकान इंस्टाग्राम स्टोरीवर मालती मेरीचा झोपलेला फोटो शेअर केलाय. याफोटोत, मालती मेरी चोप्रा जोनास बेबी स्ट्रॉलरच्या आत एका बाजूला झोपली आहे. बाळाने पांढऱ्या रंगाचं स्वेटर आणि गुलाबी टोपी घातलेली आहे. आणि तिच्याभोवती शाल गुंडाळलेली फोटोत दिसतेय. प्रियंका सहसा तिच्या मुलीच्या चेहरा हृदयाच्या इमोजीने तिचा चेहरा लपवायची मात्र तिने बुधवारी मालतीचा अर्धा चेहरा उघड केला. तिचे डोळे उबदार टोपीने झाकलेले होते तरी तिचे ओठ या फोटोत दिसताय.

 

ती झोपली असताना तिचा एक हात ब्लँकेटमधून दिसतोय. फोटो शेअर करताना प्रियांकाने पोस्टला कॅप्शन दिले, ” मला म्हणायचंय” मालती इस्टांग्रामवर एका चाहत्याने हा फोटो शेअर केला आहे. अनेक लोकांनी कमेंट करत या चिमुकलीवर प्रेमाचा वर्षाव केला. एक चाहत्याने कमेंट केलीय, “ओह शेवटी…इतकी सुंदर बाळ.” दुसर्‍याने म्हटंलय, “सुंदर राजकुमारी.” “ती खूप सुंदर आहे,” तर एका युर्जसने लिहिले. “तुम्ही तिच्याकडे बारकाईने पाहिले तर तिचे ओठ निकसारखे दिसताय”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम