निवडणुकीवर बहिष्काराची तयारी तर उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

वाडा तालुक्यातील प्रस्तावित ग्रामपंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण व सर्वसाधारण जागांवरील नाममात्र आरक्षण असल्याने ओबीसीमध्ये संताप

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 15 ऑगस्ट 2022 | जयेश शेलार| निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे येत्या 13 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. वाडा तालुक्यातील 70 ग्रामपंचायतमध्येही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र तालुक्यातील सदर ग्रामपंचायतीमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आले नाहीच तर सर्वसाधारण जागांचे आरक्षणही नाममात्र ठेवण्यात आल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवारी (15 सप्टेंबर) गांधरे येथील कुणबी समजगृह येथे ओबीसी समन्वय समितीच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी करण्यात आली असून या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याबाबत ठराव करण्यात आला.

प्रस्तावित ग्रामपंचायत निवडणुकीत लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात आले नसून अनेक ग्रामपंचायतीमध्ये सदोष आरक्षण देण्यात आले आहे. तर कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आरक्षण मर्यादा 50 टक्केपेक्षा जास्त देवू नये, असा दंडक आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी ठेवण्यात आलेल्या राखीव जागांची संख्या 50 टक्के पेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तर या बैठकीत ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याने येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची तयारी करण्यात आली असून या निर्णयाविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याबाबत ठराव करण्यात आला आहे. या बैठकीसाठी निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी व पालघर जिल्हा ओबीसी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष बी.बी.ठाकरे, जिल्हा समन्वयक नरेश आक्रे, जयेश शेलार, शिवाजी पाटील, राजेश चौधरी तसेच माजी पं.स. सदस्य अरुण अधिकारी, रंजन पाटील, वैभव पाटील, विश्वजित गोळे, गोपाळ अगीवले यांसह अन्य बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम