पालवी महिला मंडळातर्फे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १५ सप्टेंबर २०२२ । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्ताचे औचित्य साधून आयोजित केलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत पालवी महिला मंडळातर्फे १७ सप्टेंबर रोजी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा उपाध्यक्षा आणि मंडळाच्या अध्यक्षा डॉ समीरा समीर भारती यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ समीरा समीर भारती म्हणाल्या, या शिबिरात सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि परिचारिका यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. कायझेन रुग्णालयाचे हृदयरोग तज्ञ डॉ निखिल जाधव हे शिबिरार्थींची हृदयरोग आणि मधुमेह तपासणी करतील. दंत चिकित्सक डॉ. श्वेता देशपांडे या दंत तपासणी करणार आहेत. तर आयुर्वेदाचार्य आणि आहारतज्ज्ञ डॉ श्वेता देशपांडे या शिबिरार्थींना आहार आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करणार आहे. समर्थ हेल्थ केअर सेंटर येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणाऱ्या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ८१०८६६२३०४ किंवा ९७०२५७६२७५ या क्रमांकावर आगाऊ नोंदणी करावी.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम