सोन्यासह चांदीच्या दरात दिसली तेजी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ मार्च २०२३ ।  यंदाचे आर्थिक वर्ष आज संपत आहे. त्यातच उद्यापासून अनेक वस्तूचे भाव वाढ होणार आहे तर त्यापूर्वी सोने-चांदीच्या दरात चढ-उतार दिसून येत होता. आज मात्र सोन्याच्या आणि चांदीच्या दरातही तेजी दिसून येत आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. कारण परदेशी बाजारात सोन्याचे भाव वाढले आहेत.

डॉलर निर्देशांकातील नरमाईमुळे सोन्याला आधार मिळत आहे. यामुळेच एमसीएक्सवर सोन्याच्या भावात 160 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीही 350 रुपयांनी महागली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 2000 डॉलर प्रति औंस असा आहे. चांदीनेही किंचित मजबूतीसह 24 डॉलर प्रति औंस पार केली आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्या-चांदीत आणखी वाढ होणार आहे.गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,850 रुपये तर 24 कॅरेट साठी 59,820,रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 733 रूपये आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम