सणासुदीच्या काळात साखरेचे भाव कडाडणार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑक्टोबर २०२३

देशात गेल्या काही वर्षापासून वाढत्या महागाईने जनतेचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव सतत वाढत असताना देशातही चालू हंगामात साखरेचे उत्पादन घटल्याने दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा स्थितीत भारतातून साखर निर्यात वाढण्याची शक्यताही कमी होत आहे. देशातील साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडे साखर निर्यातीवर मर्यादा हा एकमेव प्रभावी उपाय उरला आहे.

आयसीआरएच्या संशोधन अहवालानुसार, एप्रिल-जुलै २०२३ दरम्यान देशांतर्गत साखरेचा दर प्रति किलो ३६ रुपये होता. ऑगस्ट ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत ते ३७ रुपयांवरून ३९ रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहे. मागणीत झालेली वाढ आणि पुरवठ्यातील कमकुवतपणा हे त्यामागचे कारण मानले जाते. अशा स्थितीत आगामी काळात त्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मूल्यांकनानुसार, २०२३ मध्ये साखरेचे सरासरी उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. वर्षभरातील सरासरी देशांतर्गत साखरेची किंमत ३५.६ रुपये प्रति किलो आहे, जी गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ च्या तुलनेत जास्त आहे. साखरेचे दर वेगाने वाढू नयेत, यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे कमी उत्पादन पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरकारने निर्यातीवर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय साखर कारखानदारांकडून दैनंदिन विक्रीचे अहवालही मिळू लागले आहेत. या निर्णयांमुळे जागतिक चिंतेमुळे वाढू शकणाऱ्या साखरेच्या किमतींवर अंकुश ठेवला जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम