आता ई-रेशनकार्ड’ने जनतेला मिळणार मोठी सवलत !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑगस्ट २०२३ | देशभरातील अनेक जनता आज देखील रेशन दुकानात जावून रेशन घेवून आपला संसार चालवीत असतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या रेशन कार्ड योजनेचा फायदा घेत आहेत. मात्र या योजनेच सरकारने आता काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

त्यानुसार, आता सरकारकडून वितरण रेशनकार्ड बंद करण्यात आले असून त्या जागी ई रेशनकार्ड सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई रेशन कार्डद्वारे धान्य खरेदी करावे लागणार आहे. ई-रेशनकार्डमुळे कार्ड मधील नाव कमी करणे, नोंदवणे, ट्रान्सफर करणे अशी कामे झटक्यात होण्यास मदत होणार आहे. नुकतीच राज्यात ई रेशनकार्ड प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने रेशनकार्ड ई कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येईल. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

या सिस्टीम मुळे आता इथून पुढे क्यूआर कोड असलेलेच ऑनलाईन रेशनकार्ड चालणार आहे. तर ई- कार्डवरुन ग्राहकांना रेशन देण्यात येईल. शासनाकडून देण्यात आलेले ई- रेशनकार्ड आपल्याला हव्या त्या स्वरूपात उपलब्ध करून घेता येऊ शकते. मेल मोबाईल पीडीएफ प्रिंट अशा सर्व स्वरूपात ई – रेशन कार्ड वापरता येऊ शकते. त्यामुळे आपल्याला कागदी किंवा फाटलेले रेशन कार्ड घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. यापूर्वी जुन्या रेशन कार्डबाबत अनेक तक्रारी निर्माण झाल्या होत्या. जुने रेशन कार्ड असल्यामुळे ते मळकट होणे, हरवणे, फाटणे, त्यावरील नावे पुसून जाणे अशा कित्येक गोष्टी रेशन धारकांना अडचणीच्या ठरत होत्या. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून तसेच सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नोंद घ्यावी यासाठी ई- रेशनकार्ड प्रणाली सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा देखील नागरिकांना होणार आहे. ई- रेशनकार्डद्वारे अर्ज करणे, पत्ता बदलणे, नावातील दुरुस्ती, नाव वगळणे अशी सर्व कामे कार्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीनेच करता येणार आहेत. तसेच यामुळे रेशन कार्ड हरवण्याची समस्या देखील निर्माण होणार नाही. दरम्यान, राज्यातील कित्येक गरीब कुटुंब रेशनकार्डवर मिळणाऱ्या धान्यावरून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत. त्यामुळे सरकारने आणलेली ही योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे. आता या योजनेचा सरकारने आणखीन प्रगत बनविले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम