बोगस खतांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑगस्ट २०२३ |  सरदार कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट खत वापरल्यामुळे जळगांव, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेकडो हेक्टर वरील पिक धोक्यात आले असुन पिके सुकु लागले आहेत रोहिणी खडसे यांनी सोमवारी बोदवड तालुक्यातील बाधित शेतांची पाहणी केली आज मंगळवार रोजी रोहिणी खड्से आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिाऱ्यांनी बाधित कपाशीचे रोपे आणि नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून खतांच्या वापरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाच्या माध्यमातून किंवा पिक विम्याच्या माध्यमातून हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी आणि बाधित शेतीवर शाश्वत उपाययोजना करावी अशी मागणी जळगांव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देउन केली.

यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या जळगाव जिल्हयातील बोदवड, जामनेर, जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशी आणि अन्य पिकांना मे सरदार ऍग्रो फर्टिलायझर अँड केमिकल कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट या रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे तिन्ही तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती या बोगस खता मुळे बाधित झाली आहे. खत टाकलेल्या शेतातील कापसाची वाढ खुंटली तर काही ठिकाणी पिक खराब झाले यात शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे  शेतीची मशागत, बियाणे, खते, खुरपणी, फवारणी, इ. आतापर्यंत शेतकरी बांधवांचा मोठा खर्च झालेला असताना या कंपनीच्या सिंगल सुपर फॉस्फेट खतांच्या वापरामुळे शेतकरी बांधवांचे या हंगामातील पिक वाया गेले आहे . पिकाचे नुकसान झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शेतकरी हवालदील झाले.असताना आज अखेर सुदधा शासन शेतकऱ्याने पीक उपटून टाकावे की तसेच ठेवावे यावर मार्गदर्शन, उपाययोजना पुरवायला तयार नाही. हंगामाची वेळ निघत चालली आहे.त्यामुळे शेतकरी बांधवाना शासनाने किंवा पिक विम्याच्या माध्यमातून हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहिर करावी व असे बोगस खत विक्री करणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करावा

आज रोजी शासन मे सरदार ऍग्रो फर्टिलायझर अँड केमिकल कंपनी हि कंपनी खाजगी कंपनी असल्याचे सांगुन मदत देण्यासाठी टाळाटाळ करत आहे परंतु राज्यात विकले जाणारे बियाणे, खते यावर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे नियंत्रण असते कृषी विभाग त्याचे विक्री नमुने तपासत असते असे असताना जिल्ह्यात बोगस खत विक्री कशी काय झाली?याला शासन ,कृषी विभाग जबाबदार आहे तेव्हा शासनाने जबाबदारी न झटकता शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहावे असे रोहिणी खडसे म्हणाल्या तसेच ज्या जमिनित हे खत दिले ती जमीन नापिक होण्याची श्यक्यता बळावली आहे यावर जर शासनाकडून शाश्वत उपाययोजना केली गेली नाही तर जमिन नापिक झाल्यामुळे शेतकरी बांधवावर आत्महत्या करण्याची वेळ येईल या बनावट खतांमध्ये तणनाशक ,बीजनाशक पावडर चा अंश असल्याने जमीन बाधित झाली आहे..या मुळे येणारे कित्येक हंगाम हे तणनाशक मिश्रित खत जो पर्यंत जमिनीत आहे तो पर्यंत ही बाधा शेतपिकाला होत राहील.

शेतजमीनच बाधित खराब झाली आहे यावर मृदा शास्त्रज्ञ यांच्या परीक्षणानुसार त्यात जमीन सुधारणा मोहीम हाती घेऊन बाधित जमिनीवर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी (MREGS )योजनेअंतर्गत सदर शेतकरी बांधवांना नाजिक च्या तलावातून गाळ माती टाकण्यासाठी मृदा शास्त्रज्ञांच्या शिफारशी नुसार हेक्टरी मापदंड वापरून पुन्हा जमिनीची उत्पादकता वाढवावी
यातून नुकसानग्रस्त शेतकरी यांच्या कुटुंबाला रोजगार मिळेल आणि बाधित जमीन सुपीक होण्यासाठी मदत होईल
शेतकरी बांधवाना यावर योग्य ते मार्गदर्शन करून चालू पिकासाठी तात्काळ हेक्टरी एक लाख मदत मिळवून देण्यात यावी व शेतजमीन नापिक होऊ नये यासाठी मृदा शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाने शाश्वत उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याकडे केल्याची रोहिणी खडसे यांनी सांगितले
जर शेतकरी बांधवाना योग्य ती मदत मार्गदर्शन मिळाले नाही तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रोहिणी खडसे यांनी दिला

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील, जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी,भरत अप्पा पाटील, निलेश पाटील,विजय चौधरी,सतिष पाटील ,प्रदिप बडगुजर, रिकू चौधरी, जगदीश कोळी,भगतसिंग पाटील, दिलीप पाटील,प्रदिप साळुंखे, चेतन राजपूत या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह मोहनसिंग पाटील, उर्मिला बाई पाटील, उमेश मातडे,आत्माराम नेवल, हरिदास पवार, उत्तम पाटील, निवृत्ती कोळी, सोपान पाटील, दिपक वाघ, जनार्धन खेलवाडे,सुरेश कोळी, कृष्णा वाघ, सुधिर खेलवाडे,दिनेश पाटील, भाग्यलक्ष्मी पाटील, धृपदा बाई पाटील, कैलास चौधरी, योगेश पाटील, निना पाटील हे शेतकरी बांधव उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम