पावसाची दांडी तर उष्णतेचे बसू लागले चटके

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑक्टोबर २०२३

देशातील अनेक राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून गणेशोत्सव काळात धो- धो बरसलेला पाऊस आता गायब झाला असून पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा चटका वाढला असून ‘ऑक्टोबर हिट’मुळे पुणेकर घामाघूम झाले आहेत.

गणेशोत्सव काळात धो- धो कोसळलेला पाऊस लवकरच निरोप घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देशभरासह काही राज्यांमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा तडाका जाणवू लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता वाढू लागली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने तापमान चांगलेच वाढत असून उष्णतेने पुणेकर घामाघूम झाले आहेत. पुणे शहरात दुपारचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्यावर नोंदवले जात आहे. मुंबई आणि पुण्यातून ६ किंवा ७ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तसेच पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून, उकाडा जाणवणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम